भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत विनोद झिंगरलाल कटरे (३०, रा. खातीटोला) हा तरुण ठार तर भूपेंद्र कांतीलाल कटरे (३५, रा. भानपूर) हा तरुण जखमी झाला. गंगाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम सुखदेवटोली येथे ९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता दरम्यान ही घटना घडली. चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३५ - एजे २३३२ च्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून विनोद कटरे याच्या दुचाकी क्रमांक एमएच ३५ - एझेड ९७४२ ला जोरदार धडक दिली होती. याप्रकरणी गंगाझरी पोलिस