रामटेक: बोथिया पालोरा शिवारात अनियंत्रित ट्रक महामार्गाच्या कडेला पलटला
Ramtek, Nagpur | Oct 17, 2025 शुक्रवार दिनांक 17 ऑक्टोबरला दुपारी बारा वाजताच्या दरम्यान नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोथीया पालोरा शिवारात महामार्गावर धावणारा ट्रक क्रमांक युके 08 सी बी 0363 हा चालकाचे ट्रक वरील नियंत्रण बिघडल्याने महामार्गाच्या कडेला झाडेझुडपात जाऊन पलटला. सुदैवाने यात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. मात्र या दुर्घटनेत ट्रकचे बरेच नुकसान झाले आहे.