बार्शीटाकळी: १८ दिवसांची तगमग संपली; अकोला पोलिसांनी १४ वर्षीय मुलाला पंढरपूरहून सुरक्षित परत आणलं
अकोला शहरातील १४ वर्षीय मुलगा तब्बल १८ दिवसांपासून बेपत्ता होता. कुटुंबाच्या तक्रारीनंतर खदान पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला अपहरणाचा संशय व्यक्त झाला, मात्र तपासात मुलगा वडिलांच्या रागामुळे घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं. प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी स्वतः तपासात हस्तक्षेप केला. पोलिसांनी सुमारे २०० सीसीटीव्ही फुटेज तपासून मुलाचा केला होता. अखेर मुलगा सापडला अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.