चाळीसगाव: चाळीसगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी आपला मतदानाचा हक्क टपाली मतदानाद्वारे (Postal Voting) बजावला आहे. एकूण २०१ कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेऊन मतदान केले. चाळीसगाव शहरात या निवडणुकीसाठी १०० मतदान केंद्रे असणार आहेत. निवडणुकीच्या अनुषंगाने, कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.