वाशिम: शेलुबाजार येथील कारंजा रोडवरील व्यवसायिकांच्या दुकानांमध्ये घुसले पावसाचे पाणी
Washim, Washim | Sep 16, 2025 वाशिम जिल्ह्यातील शेलु बाजार येथे दिनांक 16 सप्टेंबर रोजी दुपारपासून चालू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेलुबाजार परिसरातील नाले नद्यांना तुडुंब भरून वाहत असून शेलू बाजार मेन चौकात असलेल्या भारतीय स्टेट बँक सेंट्रल बँक व खाजगी दुकानांमध्ये पाणी घुसल्यामुळे एकच तारांबळ उडाली होती... शेलुबाजार मेन चौकातून जाणाऱ्या नाल्यावर बऱ्याच प्रमाणात अतिक्रमण केलेले असल्यामुळे दरवर्षीच या परिसरामध्ये पाणी शिरत असून व्यावसायिकांना याचा सामना करावा लागत आहे.