भारतीय जनता पार्टी रामटेक नगरपरिषद गटाची शुक्रवार दिनांक 9 जानेवारीला अधिकृतरित्या स्थापना करण्यात आली. या गटाच्या गटनेतेपदी नगरसेवक अलोक मानकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांच्याकडे रीतसर प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आनंदराव राऊत, मनोहर कुंभारे सहित नवनिर्वाचित भाजपा नगरसेवक प्रभाकर खेडकर, रजत गजभिये,सौ कविता मुलमुले व लक्ष्मी अहिरकर उपस्थित होते.