अकोट: बोर्डी येथील संत नागास्वामी महाराजांचा बर्शी उत्सव सोहळा व रथयात्रा सांगता;महाप्रसादाचे वितरण पार पडले
Akot, Akola | Nov 26, 2025 अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या ग्राम बोर्डी येथील ग्रामदैवत संत नागास्वामी महाराजांचा सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी उत्सव सोहळा सांगते निमित्त गावातून रथयात्रा देखील काढण्यात आली तर दुपारपासून भाविकांसाठी भव्य महाप्रसाद वितरण पार पडले गत आठवड्याभरापासून संत नागास्वामी महाराज बर्शी उत्सव सोहळ्यानिमित्त दररोज विविध धार्मिक कार्यक्रम यासह श्रीमद् भागवत कथा कीर्तन पार पडली. तर सांगता सोहळ्यानिमित्त भव्य भारुड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.