सुलीभंजन येथील हजरत शाह खाकसार (रह.), हजरत हाफिज अब्दुल हलीम (रह.) व हजरत हाफिज अब्दुल मलिक (रह.) यांच्या वार्षिक उरूसास भक्तिभावात सुरुवात झाली आहे. उरूसच्या निमित्ताने आज दि. १५ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली. दर्गा बाबा बुरहानोद्दीन गरीब (रह.) येथून सुरू झालेली ही मिरवणूक ढोल-ताशे व फुलांची चादर काढत शहरातील प्रमुख मार्गांवरून आस्ताना-ए-खाकसार (रह.) येथे पोहोचली. मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून श्रद्धा व भक्तीभाव व्यक्त केला.