उत्तर सोलापूर: राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे मार्केट यार्ड येथे गाजर आंदोलन
राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सोलापुरातील मार्केट यार्ड समोर आज बुधवारी गाजर आंदोलन करण्यात आले. महायुती सरकारकडून वारंवार सोलापूरकरांना विकासाच्या नावाखाली गाजर दाखवण्यात येते,तसेच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्थानिक आमदार हे उड्डाणपूल व विमानतळ च्या नावाने गाजर दाखवत आहेत अशी भूमिका यावेळी कार्यकर्त्यांनी मांडली.