शनिवार दि. 10 व रविवार दि.11 जानेवारीला किट्स अभियांत्रिकी महाविद्यालय रामटेकच्या मैदानावर दिव्यांगाची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा स्पेशल ऑलिंपिक भारत महाराष्ट्र क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्याची माहिती स्पेशल ऑलिंपिक भारतचे सचिव उमेश वारजुरकर, अध्यक्ष विशाल नाईक, क्रीडा नियोजन समन्वयक पंकज पांडे यांनी पराग हॉटेल रामटेक येथे आयोजित पत्रपरिषदेत शुक्रवार दि. 9 जानेवारीला सायंकाळी पाच वाजता दिली. यात राज्यातील 36 जिल्ह्यातील 320 बौद्धिक अक्षम खेळाडू व प्रशिक्षक सहभागी होतील.