पारोळा येथील किसान महाविद्यालयात शनिवार दि. 27 डिसेंबर 2025 रोजी रासेयो एकक आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थीनींसाठी युवती आरोग्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वाय. व्ही.पाटील, प्रमुख पाहुणे डाँ. डी. बी. साळुंखे तथा प्रमुख मार्गदर्शिका समाजसेविका हर्षाली महाले आणि कविता राजपूत होत्या. प्रास्ताविक डॉ. अनिता मुडावदकर यांनी मांडले.