तळा: तळा:मालाठे येथील द्रोणागिरीकडे जाणारा रस्ता २२ एप्रिल पर्यंत वाहतुकीसाठी होणार खुला.अरविंद ठमके यांची माहिती.
Tala, Raigad | Apr 3, 2024 तळा तालुक्यातील मौजे मालाठे येथील द्रोणागिरी देवस्थानकडे जाणारा रस्ता २२ एप्रिल पर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार असल्याची माहिती द्रोणागिरी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अरविंद ठमके यांनी बुधवार दि.३ एप्रिल रोजी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान मौजे मालाठे येथे दिली.याप्रसंगी देवस्थान चे सदस्य ज्ञानेश्वर महाडिक, मनोज ठमके आदी मान्यवर उपस्थित होते.