संग्रामपूर: काथरगाव फाट्याजवळ झाडात वीजप्रवाह आल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी
संग्रामपूर तालुक्यातील काथरगाव फाट्याजवळ झाडाच्या फांद्यामधून गेलेल्या वीज वाहिनीचा वीज प्रवाह झाडात उतरल्याने त्याला स्पर्श होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना 15 सप्टेंबर रोजी घडली आहे.योगेश भानुदास देवकुळे असे मृतक युवकाचे नाव आहे तर आदित्य सरदार हा गंभीर जखमी झाला आहे.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तामगाव पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद केल्याची माहिती 16 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.