कळमेश्वर तहसील कार्यालय परिसरात तीन वर्षांपूर्वी 17 आरोपींनी संगणमत करून जातिवाचक शिवीगाळ करत फिर्यादीचे घर जेसीपीद्वारे पाडले या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या आरोपींमध्ये भाजपची नगरसेवक धनराज देवके काँग्रेसचे नगरसेवक विलास मानकर आणि काँग्रेसच्या नगरसेविका अश्विनी धोंगडी यांचे पती संजय धोंगडी यांचा समावेश आहे