सावनेर (तिष्टी)काटोल मुख्य मार्गावरील सावंगी ते तेलकामठी गावा दरम्यान असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून कित्येकदा ते खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत बुजवले सुद्धा आहेत.परंतु रस्त्यातवर खड्ड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवास्याना व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणीना समोर जावे लागत आहे. या खड्ड्यामुळे ये-जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांचा समतोल बिघडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.