लाखनी: देवरी ग्रामस्थांचा रास्ता रोको आंदोलन; तहसीलदारांच्या हस्तक्षेपातून तोडगा
देवरी ग्रामपंचायत अंतर्गत पालांदूर–किटाळी राज्य मार्गावर सानगाव येथे ग्रामस्थांनी स्मशानभूमी व शेड तसेच रस्त्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन छेडले. ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून झालेले हे आंदोलन पाहता गावातील नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली. नागरिकांच्या तीव्र भूमिकेमुळे प्रशासनालाही तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी लागली. तहसीलदार, खंडविकास अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.