कळमेश्वर: ब्राह्मणी फाटा येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाज संघटनेच्या वतीने आंदोलन
आज शुक्रवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास ब्राह्मणी फाटा येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाज संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. धनगर समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी मागणी यावेळी रेटून धरण्यात आली. यावेळी धनगर समाज संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.