केंद्र सरकारच्या ‘हेल्थ सिक्युरिटी से नॅशनल सिक्युरिटी सेस बिल 2025’वर खासदार फौजिया खान यांनी आठ डिसेंबर रोजी राज्यसभेत तीव्र आक्षेप नोंदवले. या विधेयकामुळे राज्यांच्या महसुलात वाढ होण्याऐवजी आर्थिक तोटा होईल, संघराज्यीय संतुलन बिघडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.