शेवगाव: शेतकऱ्यांची पिके गेली पाण्यात,अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा दौरा..!
शेवगाव तालुक्यातील अनेक गावे अतिवृष्टीमुळे मोठ्या संकटात सापडली आहेत. नागरिकांच्या घरात पाणी शिरून संसाराचे नुकसान झाले, रस्त्यावर पाणी साचल्यामुळे ये जा बंद झाली आणि शेतकऱ्यांचे डोळ्यांचे पारणे असलेली पिके पाण्याखाली जाऊन उध्वस्त झाली.या कठीण प्रसंगी बक्तरपूर, शहरटाकळी, देवटाकळी, भावी निमगाव, मठाचीवाडी या गावांना भेट देऊन तेथील संपुर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. गावकऱ्यांच्या वेदना, शेतकऱ्यांच्या काळजाचा आवाज ऐकला. यावेळी प्रशासनाला तातडीने मदत पोहोचविण्याच्या आणि पुनर्वसनाच्या स्पष्