संगमनेर: बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी अमोल खताळ मैदानात
बिबट्या-मानव संघर्ष रोखण्यासाठी अमोल खताळ मैदानात संगमनेर विधानसभा क्षेत्रात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, आमदार अमोल खताळ यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे. बिबट्यांचे सर्वेक्षण करून त्यांची नसबंदी करण्याची मागणी त्यांनी राज्य सरकार व संबंधित विभागांकडे केली होती. या मागणीची प्रशासकीय प्रक्रिया आता केंद्र सरकार पातळीवर पोहोचली असल्याची माहिती उपवनसंरक्षक, अहिल्यानगर यांनी पत्राद्वारे आज सकाळी 11 वाजता दिली आहे.