अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला अखेर सेलू पोलिसांनी जेरबंद केले. मंगळवार, दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव ललित देवेंद्र डोके (वय 23, रा. हिंगणी) असे आहे, अशी माहिती सेलू पोलिसांनी दिली. सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना उघडकीस आली होती.