वैजापूर: मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अन्याय शेतकरी संघटनेचा उपोषणाचा इशारा तहसील कार्यालयात दिलेले निवेदन
मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर अनुदान वाटपात अन्याय झाला असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.याचच एक उदाहरण समोर आले आहे.गणेश बापूसाहेब वाडेकर यांची पश्चिम महाराष्ट्रातील राहुरी तालुक्यात शेती आहे या शेतात त्यांनी मका लावलेली होती दरम्यान अतिवृष्टीत त्यांच्या पिकाचे नुकसान झाले त्यांना 90 गुंठ्यांतही 15300 अनुदान मिळाले तर मराठवाड्यात वैजापूर तालुक्यात त्यांच्या आजींच्या नावे असलेल्या 4 एकर जमिनीसाठी 9500 रुपये मिळाले असल्याचं उदाहरण दिले आहे.