महाराष्ट्र राज्य महसूलअधिकारी व कर्मचारी समन्वय महासंघाने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेले राज्यव्यापी कामबंद आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे.दिनांक 16/12/2025 रोजी आंदोलनाची नोटीस दिल्यानंतर, दिनांक 18/12/2025 रोजी महसूल मंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला.