रामटेक: म. रा. शेतमजूर युनियन तर्फे तहसीलदार रामटेक यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीचे निवेदन
Ramtek, Nagpur | Oct 10, 2025 शुक्रवार दिनांक 10 ऑक्टोबरला दुपारी एक वाजता च्या दरम्यान शेतकरी, शेतमजुराचे कर्ज माफ करावे,शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी,शेतमजुरांना श्रम मोबदला तीन हजार रुपये द्यावा, रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावी, घरकुल लाभार्थ्यांना पाच लाख रुपये अनुदान द्यावे या व इतर मागण्यांचे निवेदन तहसीलदार रामटेक रमेश कोळपे यांना देण्यात आले. महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन तर्फे हे निवेदन देण्यात आले.