अर्जुनी मोरगाव: होत्याचं नव्हतं झालं — अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे धानपिक उध्वस्त
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील  शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धान पिकाची लागवड केली व सध्या धानपिक हे शेवटच्या टप्प्यात असून कापणी ला आले आहे परंतु दिवाळीच्या दुस-या दिवसापासुन अर्जूनी मोरगाव तालुक्यात दुपारच्या दरम्यान अचानक आभाळ काळवंडलं, आणि काही क्षणांतच मुसळधार पावसाने थैमान घातलं व तेव्हापासून दि. २८ आक्टोबरपर्यंत कधी मुसळधार तर कधी हलक्या स्वरुपात पावसाने तालुक्यात हजेरी लावून धानपिक उद्ध्वस्त केलं.