वनिता इखनकर यांची पोलीस ठाणे वाडी हद्दीतील सुराबर्डी येथे विधी इंटरप्राईजेस नावाची ओपन जिम व खेळणी साहित्य बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीतून अज्ञात आरोपीने जिमचे साहित्य व खेळणी बनविण्याचा कच्चामाल असा एकूण 13 लाख 95 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून वाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे