शिवसेना शिंदे गट आणि भाजप युतीच्या आजवर दोन बैठका झाल्या, मात्र त्याच्यातुन फार काही निष्पन्न झालेले नाही. तरी शिवसेनेला उद्याची डेडलाईन दिलेली आहे अशी माहिती भाजप आमदार संजय केळकर यांनी दिली. ते काल उशिरा दिनांक 26 डिसेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. युतीविना असो अथवा युतीसह दोन्ही प्रकारे लढाईसाठी भाजप सज्ज आहे असही त्यांनी सांगितलं.