भंडारा: लढा यशस्वी! गोसेखुर्द बॅकवॉटरने बाधित पिपरी, साहुली व दवडीपारमधील शेतीचे अखेर ड्रोनद्वारे सर्वेक्षण; संपादनाला वेग
गोसेखुर्द प्रकल्पाच्या बॅकवॉटरमुळे भंडारा तालुक्यातील पिपरी चिचोली, साहुली आणि दवडीपार (बेला) येथील शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊनही अनेक वर्षे दुर्लक्षित राहिलेल्या या प्रश्नावर अखेर प्रशासनाला जाग आली असून, दि. १९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता दरम्यान गोसेखुर्द विभाग नागपूरच्या पथकाने प्रत्यक्ष घटनास्थळी दाखल होऊन ड्रोनद्वारे सर्वेक्षण पूर्ण केले. अनेक वर्षांपासून आपल्या हक्काच्या मोबदल्यासाठी आणि जमीन संपादनासाठी गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे, अभिषेक.