नाशिकरोड येथे प्रवासादरम्यान व्यक्तीचा मृत्यू नाशिकरोड | नाशिकरोड परिसरात प्रवासादरम्यान श्वास घेण्यास त्रास झाल्याने ५७ वर्षीय व्यक्तीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. ४) दुपारी घडली. मयताचे नाव संदिप शिवकुमार आग्रवाल (वय ५७, रा. कलनंदीकुच कॉलनी, रायगड वॉर्ड नं. ३६, राज्य छत्तीसगड) असे आहे. ते गंगापूर येथील गुलमोहर कॉलनीतून छत्तीसगड येथे जाण्यासाठी नाशिकरोड रेल्वे स्टेशनकडे निघाले असताना सकाळी सुमारे १०.५० वाजता बिर्ला हॉस्पिटलजवळ त्यांना श्वास घेण्यास त्रास झाला.