गोंदिया: पंचशील चौक माताटोली येथील घरफोडीतील 3 आरोपींना 5 वर्षे सश्रम करावाच व प्रत्येकी 3 हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा
Gondiya, Gondia | May 27, 2025 शहरातील पंचशील चौक माताटोली येथील 62 वर्षीय तक्रारदार महिला फिर्यादी आपल्या पतीसोबत तीन दिवसाकरिता नागपूर येथे गेल्या होत्या. मात्र चोरट्यांनी संधीचा लाभ घेत घराचे आत प्रवेश करून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐकून दोन लाख दहा हजार आठशे नव्वद रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला होता. शहर पोलीसांनी तीन आरोपींना अटक केली. दरम्यान घरपोडी करणाऱ्या तिन्ही आरोपींना गोंदिया न्यायालयाने दिनांक 27 मे 2025 रोजी पाच वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 3 हजार रुपये द्रव्य दंडाची शिक्षा ठोठावली आहे.