रामटेक: रामटेक चित्रनगरीसाठी 60 एकर जमिनीचे 15 दिवसात हस्तांतरण; सांस्कृतिक कार्यमंत्री एड. आशिष शेलार यांची रामटेक येथे माहिती
Ramtek, Nagpur | Sep 15, 2025 चित्रपट निर्मिती आणि विदर्भात रोजगाराची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रामटेक येथे उभारण्यात येणाऱ्या चित्रनगरीसाठी येत्या 15 दिवसात 60 एकर जमीन हस्तांतरित करण्याचा तसेच चित्रनगरी निर्मितीसाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्या संदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री ऍड. आशिष शेलार यांनी सोमवार दिनांक 15 सप्टेंबरला रामटेक येथे दुपारी दोन वाजता च्या दरम्यान दिली. यावेळी वित्त व नियोजन राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल उपस्थित होते.