नागपूर ग्रामीण: नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी बिना संगम येथे गेलेल्या रेवती नगर येथील व्यक्तीच्या घरी चोरी
पोलीस ठाणे बेलतरोडी अंतर्गत येणाऱ्या रेवती नगर येथे राहणारे सुभाष धारकर हे गडाला कुलूप लावून परिवारासह नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी बिना संगम येथे गेले असता अज्ञात आरोपीने त्यांच्या फ्लॅटच्या मुख्य दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि सोन्याचे वेगवेगळे दागिने किंमत तीन लाख 69,401 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.