संग्रामपूर: पातुर्डा बुद्रुक येथे अवैध दारूसह ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त,एका जणांविरुद्ध गुन्हा दाखल
संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बुद्रुक येथे ३० आक्टोबर रोजी रात्री अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले.अवैध दारु सह ४३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून प्रदीप गजानन पवार विरुद्ध सोनाळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती १ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.