वानाडोंगरी,डिगडोह नगरपरिषद व नीलडोह नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गर्दी उसळली. तिन्ही ठिकाणी १७ नोव्हेंबरला रेकॉर्डब्रेक अर्ज दाखल झाले. विशेषतः वानाडोंगरीत सर्वाधिक उमेदवारी अर्ज भरले गेले असून भाजपामध्ये बंडखोरीचे चित्र स्पष्ट दिसले.डिगडोह नगरपरिषदेत नगराध्यक्षपदासाठी ८ आणि नगरसेवकांसाठी १०८ अर्ज दाखल झाले. नीलडोह नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठी ४ आणि नगरसेवकपदासाठी ६८ उमेदवारांनी अर्ज दाखल - केले. दोन्हींकडे शेवटच्या दिवशी मोठी वाढ दिसली.