उदगीर शहरात क्रीडा संकुलासाठी ११ एकर जागा उपलब्ध असून त्या जागेची रीतसर नोंद असताना उदगीर शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर क्रीडा संकुल बांधण्याचा घाट आमदार संजय बनसोडे यांनी घातला, आमचा क्रीडा संकुलला विरोध नाही परंतु ज्या ठिकाणी ११ एकर जागा क्रीडा संकुलसाठी आरक्षित असताना त्या ठिकाणी क्रीडासंकुल उभे न करता सार्वजनिक असलेल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर क्रीडासंकुल उभारणीचे काम सुरू करून उदगीरकरांची व शासनाची दिशाभूल करीत असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी केलाय