मंगळवेढा: अल्पवयीन मुलीला माझे तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून कारमधून नेऊन जबरदस्तीने अत्याचार, एकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
एका १५ वर्षीय शाळकरी मुलीचा शाळेला जाता येता पाठलाग करुन तसेच फोनवर बोलून मैत्री करत जवळीकता निर्माण केली व कार गाडीत बसवून पाच्चापूर ता.जत येथे नेवून तिच्यावर जबरी शारिरीक संबंध ठेवल्या प्रकरणी भैरवनाथ वसंत गायकवाड याच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान अल्पवयीन मुलीला माझे तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून जबरदस्तीने अत्याचार करण्यात आल्याचे दिलेले तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यातील पोलीस अधिक तपास करीत आहेत.