नंदुरबार: अंजना रेसिडेन्सी येथे शिक्षकाच्या घरात घरफोडी,१,६८,६६८ रु. मुद्देमाल चोरीला
नंदुरबार तालुक्यातील उपनगर पोलीस ठाण्यातील वाघोदा शिवारातील अंजना रेसिडेन्सी येथील शिक्षक अमित चौधरी यांच्या घरात घरफोडीची घटना घडली आहे. या घरफोडीत १,६८,६६८ रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी १४ सप्टेंबर रोजी दुपारी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.