विधानसभेत लाडक्या बहिणींनी महायुतीला साथ दिली या निवडणुकीत पुन्हा लाडक्या बहिणी चमत्कार घडवतील तसेच विकासाची वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी टीका माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव न घेता आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केली. नेवासा नगरपंचायत निवडणुकीत शहरात महायुतीच्या प्रचार रॅली दरम्यान ते बोलत होते.