पोलादपूर: शिक्षण संस्था, शिवसेनेच्या वतीने माध्यमिक विद्यालय सवाद पोलादपूर येथे २१८ विद्यार्थ्यांना ६५४ मोफत वह्या वाटप
आज शुक्रवार दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य मा.श्री.निलेश भगवान सांबरे व शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमानाने माध्यमिक विद्यालय सवाद तालुका पोलादपूर जिल्हा रायगड येथे २१८ विद्यार्थ्यांना एकूण ६५४ मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिक्षण संस्थेचे कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे पदाधिकारी देखील उपस्थितीत होते.