घनसावंगी: देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी धनंजय मुंडे याला वाचवून पापाचे भागीदार होऊ नये! जरांगे पाटलांकडून गंभीर आरोप
धनंजय मुंडे आणि त्याचे टोळीने मला मारण्याचा कट रचला होता. जेवणात विष कालवून किंवा अंगावर गाडी घालून ते मला संपवायला निघाले होते. आता तोच धनंजय मुंडे तुमच्या पायाशी लोळन घेऊन मला घातपाताच्या चौकशीपासून टाळा म्हणतो आहे. अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याला वाचवू पाहत आहेत. त्याला क्लीन चीट देण्यात येत आहे. धनंजय मुंडेला वाचवून त्याच्या पापाचे भागीदार तुम्ही होऊ नका, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस, पवार यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.