हिंगणघाट: उपविभागीय पोलीस अधीकारी पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची मॅफेड्रान वाहतूक करणाऱ्या दोघा विरोधात कारवाई
हिंगणघाट शहरातील उपविभागीय पोलीस अधीकारी पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मॅफेड्रान वाहतूक करणाऱ्या विरोधात कारवाई करीत १०.१३ ग्रॅम मॅफेड्रान सह दुचाकी क्रमांक एमएच ३२ एच ५७९१ एक मोबाईल असा एकुण १ लाख ९४ हजार ३६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत दोन आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.या कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशीव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील नायर यांच्या मार्गदर्शनात केली आहे.