अकोला: अपघातात जखमी तरीही लोकशाहीचा मान राखत अनिल काईंगे यांची मतदानाला हजेरी!
Akola, Akola | Dec 2, 2025 हेडलाईन: अपघातात जखमी तरीही लोकशाहीचा मान राखत अनिल काईंगे यांची मतदानाला अकोल्याच्या हिवरखेड येथे लोकशाहीप्रती अपार निष्ठा दाखवत अपघातात जखमी झालेल्या अनिल काईंगे यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपला मतदानाचा अधिकार बजावला. उपचार सुरू असतानाही लोकशाहीची किंमत ओळखून त्यांनी व्हीलचेअरवर मतदान केले. अनिल यांच्या या कर्तव्यनिष्ठ भूमिकेने परिसरातील मतदारांना प्रेरणा दिली असून त्यांनीही मोठ्या उत्साहात मतदानाला हजेरी लावली. जखमी अवस्थेतूनही मतदान करण्याचा संदेश दिला