महिला कबड्डीपटू आत्महत्या प्रकरणाबाबत क्रीडा मंत्र्यांनी उत्तर दिले एकीकडे सरकार बेटी बचाव बेटी पढाव चे घोषवाक्य देते पण आज एका राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीला मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करावी लागत आहे हे सरकार खेळाडूंचे संरक्षण करू शकत नाही मंत्री महोदय सांगत आहेत की आरोपी हा कबड्डी असोसिएशनशी संबंधित नाही परंतु जो कोणी गुन्हेगार आहे त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ही लक्षवेधी सूचना गृहखात्याकडे वळवण्यात यावी अशी मागणी आमदार नाना पटोले यांनी केली