शिरपूर: भाटपुरा येथे विवाहितेची आत्महत्या, सासरकडील लोकांवर गळफास लावल्याचा आरोप
Shirpur, Dhule | Sep 15, 2025 शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथे १५ सप्टेंबर२०२५ रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ३८ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. रेखाबाई सुभाष पाटील गुजर वय ३८, रा. भाटपुरा ता.शिरपूर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून तिच्या मृत्यूनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या मृत्यूबाबत माहेरच्यांनी गंभीर आरोप करत सासरकडील लोकांनीच गळफास लावल्याचा संशय व्यक्त केला आहे.