मुलचेरा: मल्लेझरी येथे जागतिक वन दिन साजरा, विविध विषयावर जनजागृति
जागतिक वन दिना निमित्त आज दि.२१ मार्च शूक्रवार रोजी सकाळी ११ ते ४ वाजेदरम्यान मूलचेरा तालूक्यातील मारखंडा वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत येणार्या गूंडापल्ली उपक्षेत्रातील मल्लेझरी गावात विविध उपक्रमा चे आयोजन करण्यात आले होते.आलापल्ली वनपरिक्षेत्राचे उपवनसंरक्षक टोलीया व साहायक वनसंरक्षक आझाद यांचा मार्गदर्शनात मार्कंडा वनपरिक्षेत्र अधिकारी तनुजा मोढले यांचा अध्यक्षतेखाली जागतिक वन दिना निमित्त कलापथकाचा माध्यमाने जगंलात लागणारा वनवनवा,अवैध शिकार ,वृक्षतोड याबाबद जनजागृति करण्यात आली.