सेंट जॉन्स स्कूलमध्ये आर्ट अँड क्राफ्ट व सायन्स मॉडलचे स्पर्धेचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील सेंन जॉन स्कूल मध्ये आज आर्ट अँड क्राफ्ट व सायन्स मॉडल स्पर्धेचे आयोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते . या स्पर्धेमध्ये शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला व स्पर्धेमध्ये भाग घेतला . या स्पर्धेची पाहणी शाळेची मुख्याध्यापिका अतुल्या सिस्टर डॅनी सिस्टर व शाळेतील शिक्षकांनी केली .अंदाजे या स्पर्धेमध्ये 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .