औंढा नागनाथ: जलाल दाभा शिवारात पायी चालताना हृदयविकाराच्या झटक्याने एकाचा मृत्यू; औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद
औंढा नागनाथ तालुक्यातील जलाल दाभा शिवारातील टावर नंबर 234 पासून 235 कडे पेट्रोलिंग करत पायी चालत जात असताना हृदयविकाराचा झटका येऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तुळशीराम महादजी कराळे वय 55 वर्ष राहणार बोल्डावाडी तालुका कळमनुरी असे मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी विद्युत सहाय्यक शिवसागर सोमनाथ रणखांब यांनी दिलेल्या खपरीवरून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात दिनांक 25 नोव्हेंबर मंगळवार रोजी सायंकाळी चार वाजे दरम्यान अकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली