हिंगणा: मिहान परिसरात वाघाचे दर्शन परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण
Hingna, Nagpur | Oct 8, 2025 मिहान परिसरात काही तरुणांना कारने फिरत असताना वाघाचे दर्शन झाले. त्या तरुणांनी वाघाचा मुक्तसंचार आपल्या मोबाइलमध्ये कैद केला आणि त्याचा व्हिडीओ बनविला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आणि परिसरातील नागरिकांमध्ये धडकी भरली. वाघाचे दर्शन झालेला परिसर सेमिनरी हिल्स, हिंगणा आणि बुटीबोरीच्या वनपरिक्षेत्रात येत असल्याने वनविभागाची झोप उडाली.मिहान परिसरातील वाघाच्या भटकंतीचा व्हिडीओ व्हायरल झाला.