अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना गोपनीय मिळालेल्या माहितीनुसार आज दिनांक 30 डिसेंबर २०-२५ रोजी दुधना नदी पात्रातून अवैध वाळू उपसा आणि त्याची चोरटी वाहतूक ट्रॅक्टरच्या सहाय्याने होत असल्याचे माहिती मिळाल्या वरून घटना स्थळी दोन ट्रॅक्टर वाळू उपसा करत असताना आढळून आले. पथकाला पाहताच वाळू सह एक ट्रॅक्टर ट्रॉलिसह पळून गेले. तर दुसरे एक ट्रॅक्टर वाळूसह पकडून अंबड येथील तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.