सावंतवाडी: पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथे भाजप युवा नेते विशाल परब यांच्या तर्फे फिरता डिजिटल दवाखान्याचा शुभारंभ..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे डिजिटल दवाखाना हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाचा आज बुधवार १७ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता शुभारंभ करण्यात आला.